pik vima crop पिक विमा नुकसान भरपाई मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून तुमच्या पिकाच्या नुकसानीची ऑनलाईन तक्रार करावी लागणार आहे.
पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ऑनलाईन तक्रार कशी करावी लागणार त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.
ज्या पिकांचा शेतकरी बांधवानी पिक विमा काढलेला आहे त्या पिकांचे या पावसामुळे नुकसान झाले असेल तर लगेच पिक नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस द्या जेणे करून तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळू शकेल.
हि सूचना तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील पिक विमा कंपनीस देवू शकता. पिक विमा कंपनीस झालेल्या नुकसानीची सूचना कशी द्यावी या संदर्भात या लेखामध्ये अगदी तपशीलवारपणे माहिती देण्यात आलेली आहे.
हि पद्धतीचा उपयोग करून तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या शेतातील झालेल्या पिक नुकसानीचा पिका विमा कंपनीस सूचना देवू शकता.
तुमची सूचना प्राप्त झाल्यावर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या शेताला भेट देतील आणि त्यानंतर तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळू शकेल.
pik vima crop app वरून करता येतो ऑनलाईन अर्ज
एक शासकीय ॲप्लिकेशन आहे या ॲपचा उपयोग करून शेतकरी त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस देवू शकतात.
परंतु तुम्ही जर तुमची पिक विमा काढलेली पावती बघितली तर त्यापावतीच्या सर्वात खाली तुम्ही कोणत्या कंपनीकडून तुमच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला आहे त्या कंपनीचे नाव दिलेले असते.
त्या कंपनीच्या वेबसाईटवर किंवा ॲपचा उपयोग करून देखील तुम्ही पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची माहिती देवू शकता.
crop insurance app चा फायदा असा आहे कि यामध्ये तुम्ही कोणत्याही पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची सूचना देवू शकता. एकदा का तुम्ही तुमच्या पिक नुकसानीचा क्लेम या शासकीय ॲपद्वारे केला कि मग शासनाकडून संबधित पिक विमा कंपनीस शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीच्या सुचने संदर्भात कळविले जाते आणि मग कंपनी तत्काळ कार्यवाहीस लागते.
तुम्ही तुमच्या पिक विमा पावतीवर उल्लेख केलेल्या कंपनीच्या वेबसाईटवर देखील पिक नुकसानीची माहिती देवू शकता.